मेंढपाळ प्रभु मेंढरांचा – Mendhapal Prabhu Mendharancha Marathi Christian Song
मेंढपाळ प्रभु मेंढरांचा
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
1.नाही अबाल माझ्या जिवाची
का करु मैत्री मी या जगाची
मुखी नित्य गजर गायनांचा
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
2.देइ चारा पाहा पाखरांना
छान पोषाख देतो फुलांना
साज नव्हता जसा शलमोनाचा
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
3.त्याची कळपावरी प्रिती खास
खरा मेंढपाळ म्हनत्यात त्यास
मला क्रुसाचा अभिमान त्याच्या
त्यावरी भाव माझ्या जिवाचा
Anointed Worship Song
स्तोत्रसंहिता 23:1-6 MARVBSI
[1] परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.
[2] तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो.
[3] तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.
[4] मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.
[5] तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
[6] खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

